पंचवटी अपार्टमेंट समोर इमारतीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश

नगर परिषद कडून बांधकाम परवानगी न घेता सुरु आहे 3 मजली इमारतचे बांधकाम

0

जितेंद्र कोठारी, वणी: येथील वरोरा रोडवर बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचे बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश नगर परिषद मुख्याधिकारी यांनी दिले आहे. नगर परिषद कडून कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम होत असल्याचे आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार वरोरा रोडवरील पंचवटी अपार्टमेंटच्या समोर शीट क्र.17 बी, भूखंड क्रमांक 16 या जागेवर येथील एका व्यावसायिकाने आपल्या पत्नीच्या नावावर अंडरग्राऊंड पार्किंग व त्यावर 4 मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सदर बांधकाम नियमबाह्य व बांधकाम नियमांना बगल देऊन होत असल्याची तक्रार पंचवटी अपार्टमेंट येथील रहिवासी ऍडव्होकेट आतिष तिलोकचंद कटारिया व इतर सदनिका धारकांनी केली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषद कार्यालयाने दि. 4 जून 2021 रोजी बांधकाम धारकास नोटीस बजावून कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. मात्र बांधकाम धारकांनी बांधकाम परवानगी संबंधी कोणतेही कागदपत्रे नगर परिषदकडे सादर केली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी, न.प. वणी यांनी 12 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 51, 52, 53, 54 अंतर्गत बांधकाम धारकास नोटीस देऊन विना परवाना सुरु बांधकाम त्वरित थांबविण्याचे आदेश दिले आहे. बांधकाम बंद न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही नोटिसमध्ये देण्यात आला आहे.

वणी नगरपरिषद क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत अाहे. शहराच्या विविध भागात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहे. नागरी क्षेत्राच्या विस्तारासह शहरात मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम होत आहे. जुन्या इमारती पाडून त्यावर अनेक मजले चढत आहे. मात्र नगर परिषद व सहाय्यक संचालक नगर रचना विभागाकडून या बांधकामाची अपेक्षित प्रमाणात परवानगी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. जुने बांधकाम असलेल्या निवासस्थानाच्या विस्तारीत कामांकरीता मागणी करण्यात येणारे कागदपत्र उपलब्ध नसल्याने परवानगी न घेता अनधिकृत प्रकारे जास्त क्षेत्राचे बांधकाम करण्याचे प्रकार वाढले आहे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.