गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली दिलीपजी ठाकूर यांच्या हस्ते कलशस्थापना होईल. सकाळी 9.00 ते 11.00 वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा होईल. दुपारी 12 ते 2 पर्यंत नागपूर येथील मिलमिले यांचं सुगम संगीत होईल.
दुपारी 3 ते 5 या वेळात विदर्भातील ख्यातनाम गायक तथा अमरावती येथील महिला महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि त्यांच्या शिष्या प्रीती देशमुख यांची भक्तिसंध्या होईल. यात पखवाजची साथ महेंद्र बोडे, तबल्याची साथ राहुल बलखंडे, व्हायोलीनची साथ हरीश लांडगे, हार्मोनियमची साथ मोहन पोकळे, ऑक्टोपॅडची साथ वीरेंद्र गावंडे, की-बोर्डची साथ दीपक चौधरी तर सहगायन संगीता गावंडे व लक्ष्मी गायकवाड करतील. या भक्तिसंगीताच्या मैफलीचे निवेदन कवी व लेखक सुनील इंदुवामन ठाकरे करतील.
सायंकाळी 6.30 वाजता श्रीमद् भागवत कथा, रात्री 9.30 वाजता महाप्रसाद व ह.भ.प. अजय महाराज बोबडे यांचचं भारूड होईल. या सप्ताहात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.