परमडोहच्या जि. प. शाळेत पालक प्रशिक्षण वर्ग

पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील परमडोह येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारला पालक प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून पालकांचे कर्तव्य, विध्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांचे शाळेचे वय होते न होते तोच त्याला अंगणवाडी, कॉन्व्हेंट किंवा शाळेत टाकून पालक मोकळे होतात. मग पुढील जबाबदारी शाळेचीच असा त्यांचा समज असतो. मात्र आपण आपल्या मुलांसाठी किती आणि कसा वेळ देतो. याचा विचार करत नाही.

६ ते १४ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे.  परंतु  अनेक पालक आपले कर्तव्य सोईस्करपणे विसरतात. मुले दैनंदिन जीवनात शालेय वेळापेक्षा पालकांसोबत अधिक वेळ असतात. म्हणून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकाने जागरूक असणे आवश्यक असते. त्यासाठी पालकांचे वागणे पारदर्शी असणे गरजेचे असते. मुलांची मित्र मंडळी कशी आहेत. मुलांच्या अंगी कोणते कलागुण आहे. याची जाण पालकांना असणे गरजेचे असते.

पालकांनी पाल्याशी कसे वागावे ?, मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी काय करावे ?, अभ्यासाचे महत्त्व मुलांच्या मनावर कसे ठसवावे ?, घरातील वातावरण अभ्यास करण्यासाठी पूरक कसे ठेवावे ? आदी विषयावर सपाटे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी शाळा सुधार समितीचे अध्यक्ष देविदास राजूरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सपना केळझरकर उपस्थित होत्या.

कार्यक्रमाला गणपत राजूरकर, सतिश थेरे, विनोद येलेकर, अरविंद कोडापे, गणेश थेरे, विनोद डवरे, प्रविण ढवस, सुदर्शन वाभिटकर, दिलिप थेरे, हनुमान डवरे, महादेव थेरे, पुरुषोत्तम वासेकर, किशोर कोडापे, बालाजी वाभिटकर उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.