देव येवले, मुकुटबन: झरी मांगली येथील देशी दारूचे परवानाधारक दुकान हटविण्यात यावे या मागणीसाठी मांगलीच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी शनिवारी जि.प. शाळेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. दारूबंदीविरोधातील मोहिमेत पुन्हा एकदा नारीशक्तीचा विजय झाला आहे.
मुकुटबन येथील बार व दारू दुकाने बंद झाले. त्यामुळे परिसरातील गावातील मद्यपीचा कल या गावाकडे वाढला. मांगलीत देशी दारूचं दुकान सुरू आहे. त्याचे मोठे दुष्परिणाम ग्रामस्थांना सहन करावे लागत आहे. सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत गावात मद्यपींची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गावातील तरूणी, शाळेतील मुले -मुली यांना या मद्यचा नाहकत्रास सहन करावा लागत आहे.
दारूच्या दुकानामुळे समाजस्वास्थ बिघडत असल्यानं हे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. याआधी 15 ऑगस्टला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला होता. त्याच दरम्यान शनिवारी 26 ऑगस्टला हा विषय जिल्हा परिषद शाळेत सभेचे आयोजन करून पुन्हा घेण्यात आला.
(मोकाट जनावरांना आळा घालणार कोण ? नगर पालिका प्रशासन सुस्त)
त्यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नितीन गोरे प्रमूख पाहुणे म्हणून होते. तर सदस्य टीपेस्वर मादेवार, जिवने, सचिव मुके उपस्थित होते. सभेला गावातील महिलासह गावकरी उपस्थित होते. अखेर महिलांच्या पुढाकारामुळे गावात पुन्हा एकदा महिलांना दारूबंदीविरोधात यश मिळालं आहे.