झरी तालुक्याचे ठिकाण, मात्र प्रवासी निवा-याचा पत्ता नाही
विद्यार्थीनींना घ्यावा लागतो दुकानात आसरा
राजू कांबळे, झरी: झरी हा तालुका होऊन आज अनेक वर्ष झाली आहे. मात्र आजही या ठिकाणी बसचा निवारा नाही. तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना काही ना काही कामा निमित्य झरी येथे यावे लागते. दुर्गम भाग असल्याने बसची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे तालुक्याचे ठिकानातील काम संपले की गाडीची वाट पाहत एखाद्या पान टपरीचा किंवा एखाद्या दुकानाचा आसरा घ्यावा लागतो.
एखादा व्यक्ती जर तालुक्याबाहेरून जेव्हा झरीत येतो तेव्हा तो बस निवारा शोधत असतो. अशा वेळी त्याची चांगलीच तारांबळ उडते. तसंच झरीत प्रसाधन गृह नाही त्यामुळे देखील इथं येणा-या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे शाळेत जाणारे विद्यार्थी यांना बस निवारा नसल्यामुळे त्यांनी तर चक झरी येथील औषधी दुकानाला बस निवारा बनवला आहे.
(हे पण वाचा: परिसरात कोळसा तस्करीला उधाण, पोलीस, वेकोलीचे पाठबळ ?)
आता झरी हे गाव राहिले नसून ते नगरपालिका झाली आहे. या मुळे या गोष्टींकडे सर्व लोकप्रतिनिधि व आमदार यांनी विशेष लक्ष देऊन झरी येते बस निवारा करावा अशी मागणी झरी आणि तालुक्यातील रहिवाशी मागणी करीत आहे.
(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )