तंत्रस्नेही गुरुजींच्या विरुद्ध पोलिसात तक्रार

शाळेतील पासवर्ड बदलल्याचे प्रकरण 

0

रवि ढुमणे, वणी: वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दहेगाव येथील शाळेचा पासवर्ड ऑनलाईन कामे करणाऱ्या तंत्रस्नेही शिक्षकाने हेराफेरी केली असल्याने संबंधित शिक्षकाला बदलीचा ऑनलाइन अर्ज सादर करता आला नाही. परिणामी बदली प्रक्रियेपासून सदर शिक्षकाला वंचित राहावे लागणार असल्याची तक्रार दहेगाव शाळेतील शिक्षकाने वरिष्ठांच्या सूचनेवरून पोलिसात दिली आहे. परिणामी वणीतील तंत्रस्नेही शिक्षक आता पोलिसांच्या रडारवर आले आहे.

 

मुकुटबन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दहेगाव (घोंसा) येथील मुख्याध्यापकाने शाळेचे ऑनलाईन कामे करण्याचे काम वणीतील तंत्रस्नेही असलेल्या शिक्षकाकडे दिले होते. सदर मुख्याध्यापकाचे स्थानांतरण इतरत्र झाल्याने सरल पोर्टल,सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती,विद्यार्थी पोर्टल,ची कामे वणीतील तंत्रस्नेही शिक्षका कडून करावयाचे सांगितले होते.  त्यामुळे दहेगाव येथील सहायक शिक्षकाने वणीतील तंत्रस्नेही शिक्षकाकडे ऑनलाईन कामे केलीत. परंतु जेव्हा बदलीचा अर्ज ऑनलाईन भरला आणि तो अर्ज वरिष्ठ कार्यालयाने नाकारला . त्यानंतर परत अर्ज करायला गेल्यावर शाळेचा पासवर्ड कोणीतरी बदलविला असल्याचे तंत्रस्नेही शिक्षकाने सांगितले. परिणामी सदर सहायक शिक्षकाला अर्ज  भरता आला नसल्याने बदली प्रक्रियेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

 

शाळेचे ऑनलाईन संगणकीय कामकाज वणीतील तंत्रस्नेही असलेले घनश्याम पाटील हे करतात. त्यांच्याकडे तालुक्यातील बहुतांश शाळांचे ऑनलाईन कामकाज आहे.  या कामाचा ते मोबदला सुद्धा घेतात. असे असतांना दहेगाव शाळेतील हरिहर निमसटकर या शिक्षकाला पासवर्ड हेराफेरी केला असल्याची बतावणी तंत्रस्नेही शिक्षकाने केली होती.  जेव्हा शाळेतील पासवर्ड हा फक्त पाटील यांना माहीत असतांना दुसरे कोण हेराफेरी करणार असा प्रश्न उपस्थित होते आहे

 

हरिहर निमसटकर यांनी बदलीसाठी स्टाफ पोर्टल उघडण्यासाठी प्रयत्न केले असता पासवर्ड बरोबर नसल्याने त्यांना बदलीचा अर्ज भरता आला नाही. त्यामुळे त्यांनी तंत्रस्नेही शिक्षकाने यात स्वतःच हेराफेरी केली असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांना दिली. त्यावरून बिईओ नी पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना केल्या. तेव्हा निमसटकर यांनी संबंधित तंत्रस्नेही शिक्षकाविरुद्ध  मुकुटबन ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  मात्र संबंधित कामकाज वणीत केल्याने  सदर प्रकरण वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात असल्याची चर्चा आहे.  एकूणच ऑनलाईन कामे करण्यासाठी ज्यांची नियुक्ती केली आहे त्यांच्यावर येथील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.  एखादा शिक्षक बदली अर्ज भरण्यापासून वंचित राहतो आणि प्रशासकीय अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा ते तंत्रस्नेहीची पाठराखण करतात त्यामुळेच सामान्य शिक्षकावर अन्याय होतो अशी चर्चा शिक्षक वर्तुळात चांगलीच रंगली.  आता पासवर्ड ची हेराफेरी करणाऱ्या त्या शिक्षकावर कोणती कारवाई होणार हे पुढील काळात कळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.