चला पाटाळ्याच्या धुळेला… यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

उद्या गुरुवारी दिनांक 28 रोजी वर्धा नदीच्या तिरावर भव्य यात्रा

निकेश जिलठे, वणी: दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुवारी दिनांक 28 डिसेंबर रोजी वर्धा नदीच्या तीरावर पाटाळा धुळ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. दु. 12 वाजता घोरपडे महाराज व संच यांचा भजनाचा कार्यक्रम आहे. शिवाय अखिल सातोकर, संचालक वेदा लॉन्ज यांच्या तर्फे येणा-या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावावी, असे आवाहन ग्रामपंचायत सावर्ला व सावर्लावासीयांतर्फे करण्यात आले आहे.

वणीकरांसाठी पाटाळ्याची धुळ म्हणजे केवळ एक धार्मिक यात्राच नाही तर छोटेखाणी ट्रीप देखील असायची. दुरदुरून भाविक या यात्रेला येतात. कॉलेज तरुणांसाठी पाटाळ्याची धुळ म्हणजे मित्रांसह काढलेली एक सायकल रॅलीच असायची. पुढे ही जागा बाईकने घेतली. मात्र काळाच्या ओघात या यात्रेचा उत्साह काहीचा कमी होताना दिसत आहे. ही परंपरा जीवित ठेवण्यासाठी सावर्लावासी प्रयत्नशील आहे. 

या यात्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन सावर्ला गावाचे सरपंच कुंदा चोपणे, उपसरपंच अविनाश सोमलकर, सचिव एसबी शेंडे तथा सर्व ग्रामपंचायत सदस्य व सावर्ला गावातील रहिवाशांनी केले आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.