सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण येथील आश्रम शाळेत 17 जुलै रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वृक्षारोपण करून शाळेला सुरूवात करण्यात आली. सन 2019 मध्ये प्रकल्प कार्यालय पांढरकवडा यांचे कडून 150 झाडं लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, त्यातील 114 झाडे आज रोजी जिवंत असून चांगल्या स्थितीत आहे.
शाळेत झालेल्या वृक्षारोपणात एकूण 25 कर्मचा-यांनी प्रत्येकी एक या प्रमाणे 25 वृक्षांची लागवड केली. ज्यात गुलमोहर, कडूनिंब या जातीचे झाडांची लागवड करण्यात आली. यात शाळेचे माध्य मुख्याध्यापक सतिश दासपतवार ,प्राथ मुख्याध्यापक अतुल गणोरकर,तर शिक्षक गजानन चंदावार, प्रमोद केलेगुंदी, अतिष कडू, कु. शुभांगी लिहितकर, राहुल मानकर, राकेश परसावार, विशाल खोले, कु. नीलम गेडाम, विक्रम मूत्यालवार
अधीक्षक अजय भूतमवार, कु. मयुरी ठेंगणे तसेच उमेश बलकी,महेश कासावार, कु.मोनिका बोनगीरवार तर वसतिगृह कर्मचारी गजानन गिज्जेवार, सौ.वैशाली तोटेवार ,अशोक गोदूरवार, सचिन भादीकर, प्रशांत मुके, जमीर शेख, गजानन भिंगेवार, विलास मेश्राम, गजानन संगपगवार उपस्थित सर्व कर्मचारी बांधवानी वृक्षारोपणाची जबाबदारी स्वीकारून कर्तव्य पार पाडले.