उभी बाटली जिंकली, अखेर नारीशक्तीचा पराभव

0

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील पाटण येथे आडवी बाटली व उभी बाटली करिता मतदान घेण्यात आले. यात उभी बाटली जिंकली. त्यामुळे महिलांचे दारूबंदीगावाचे स्वप्न भंगले आहे. राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे व मतदानासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्यामुळे उभ्या बाटलीला महिलांना मतदान करण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषद शाळेत सकाळी ८ वाजतापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आडव्या व उभ्या बाटली साठी मतदान घेण्यात आले. 1456 पैकी 583 महिलांनी मतदान केले. येथे फक्त्त ४० टक्के मतदान झाल्याने उभ्या बाटलीचा विजय झाला.

बूथ नंबर 1 भाग क्रमांक 272 मध्ये 609 महिलापैकी 244 महिलांनी ४०.०६ टक्के म्मतदान केले. तर बूथ नंबर 2 भाग क्रमांक 273 मध्ये 463 महिलापैकी 163 महिलांनी 37.14 टक्के मतदान केले. बूथ नंबर 3 भाग क्रमांक 274 मध्ये 384 महिलापैकी 167 महिलांनी 43,48 टक्के मतदान केले 1456 पैकी 583 मतदान महिलांनी केले. या मतदानात एकूण मतदान 40.04 टक्के झाले. त्यानंतर ५ वाजता मत गणना घेण्यात आली. त्यात आडव्या बाटलीला 410, उभ्या बाटलीला 115 तर 58 मत अवैध झाले. त्यामुळे आडव्या बाटली चा पराभव झाला असून उभ्या बाटलीचा विजय झाला.

पाटण येथील महिलांनी दारू बंदी करिता मतदान न करता राजकारणी लोकांच्या हस्तक्षेपामुळे व मतदारात आर्थिक उलाढाल झाल्यामुळे उभ्या बाटलीला मतदान करण्यास भाग पाडले, ह्या निवडणूकीत राजशक्ती व धनशक्तीचा वापर करण्यात आला असा आरोप रामलू आईटवार यांनी केला आहे. तर आम्हाला पाच ऐवजी दोन वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ देऊन कमी मतदान झाल्याने उभ्या बाटलीला स्थान मिळाल्याचा आरोप करण्यात आला असून दुसऱ्यांदा मतदान घेण्याकरीता उच्चन्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

निवडणूक अधिकारी गणेश राऊत यांच्या मार्गदनाखाली केंद्र क्र. 1 मध्ये नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, चंद्रकांत भोयर, अमर पडवेकर, तुळसीदास गोहणे केंद्र क्र 2 मध्ये विलास बोलपल्लीवार, महेंद्र देशपांडे, अशोक पंधरे, दीपक जोगी केंद्र क्र 3 मध्ये विजय मते, अविनाश येरावार, राजेंद्र मेश्राम, प्रवीण नागतुरे, शिपाई महादेव मोहुर्ले, गटविकास अधीकारी सुभाष चव्हाण, दुय्यम गटविकास अधिकारी शिवाजी गवई, तलाठी बाळकृष्ण येरमे, महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा कृष्णाजी आखरे, दुय्यम निरीक्षक वणी कुंदन कुमरे, अविनाश पेंदोर, पवार, रामटेके ह्यांनी कामगिरी पाडली ठाणेदार लष्करे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल चौधरी, अमोल अनेरवार, सपना पंधरे, जया रोगे व इतर कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्तात पार पाडले.

1456 पैकी 583 महिलांनी मतदान केले. ह्या मतदानात पन्नास टक्क्यापेक्षा एक तरी मतदान आवश्यक होते. आडव्या बाटली विजय होण्याकरीता ७२९ मतदान होणे आवश्यक होते. परंतु येथे फक्त्त ४० टक्के मतदान झाल्याने उभ्या बाटलीचा विजय झाला. त्यामुळे महिलांचे दारूबंदीचे स्वप्न भंगले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.