सुशील ओझा, झरी: कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव लक्षात घेता पाटण झरी ग्राम पंचायत तर्फे संपूर्ण गावात निर्जंतुकिकरण फवारणी केली. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्याच्या द्रुष्टीने सँनिटायझर व मास्क आशा वर्कर्सना गावात फिरुन वाटप केले.
मुकुटबनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत. त्यांची लोकांची उपासमार होवू नये म्हणून त्यांना सुद्धा सरपंच रमेश हलालवार व ग्राम विकास अधिकारी विजय उईके यांनी अन्नधान्य, किराणा व जीवनावश्यक सामान मोफत दिले. यावेळी ग्रा.प सदस्य. शेखर बोनगीरवार,व गावातील नागरीक शेख हसन,अशोक गिज्जेवार कपिल अंगलवार ग्रा.प कर्मचारी राकेश पडलवार हजर होते.
पाटण गावात कोरोना चा फैलाव होवु नये या करीता ग्रामपंचायत मार्फत नियमीत जनजाग्रुती करीत असुन गावात ठिकठीकाणी कोरोना पासुन बचाव करणेबाबतचे बँनर्स लावले आहेत कोरोना विषाणु आपल्या घरापर्यंत येवु नये या करीता स्वतःची व कुंटुबाची काळजी घ्या घरी राहा, सुरक्षीत राहा प्रशासनास सहकार्य करा कोरोनाला हद्दपार करा असे आव्हाहन सरपंच रमेश हलालवार यांनी केले आहे.