सुशील ओझा, झरी : तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आपल्या पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवून पायउतार करण्यात आले. विभागीय आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केला. तसेच सचिवाची चौकशी करून शितस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले आहे. .
रमेश हललवार असे पायउतार झालेल्या सरपंचाचे नाव आहे. पाटण ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रवीण शिवारेड्डी नोमुलवार यांनी ५ एप्रिल २०१९ रोज अमरावती विभागीय आयुक्तलयात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलाम ३९ (१) नुसार तक्रार दाखल केली होती. सरपंच हललवार यांनी २ ऑक्टोबर २०१६ रोजी ग्रामसभा घेऊन ठराव क्रमांक ७ नुसार मंजुरात करण्यात आला. त्या ठरावात अशोक बाष्टावार यांच्या घरापासून तर अशोक गोदूरवार यांच्या घरापयंर्त, गोपाल राजगडकर ते रामचंद्र मडावी व प्रकाश पोलकमवार यांच्या दुकानापासून ते मो. शरीफ ते मो हुसेन यांच्या घरापयंर्त जोड रस्ता तसेच नरसाबाई बाजलवर ते झरी रोडपयंर्त ५ लाख रुपयांची कामे घेण्याचे ठरले होते.
कामाची तांत्रिक मंजुरातही देण्यात आली. परंतु ८ डिसेंबर २०१७ च्या मासिक सभा ठराव क्र ३/१ नुसार परस्पर कामाच्या ठिकाणात बदल केल्याचे आढळले. नियमाने कामाचे ठिकाणी बद्दलण्यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी व ग्रामसभा सुद्धा घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियमानुसार सरपंच दोषी असल्याचे नमूद करण्यात आले..
तसेच १४ वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत टाकी ते अजाबराव सीडाम, केशव भोयर ते किष्टु अडपावार यांच्या घरापयंर्त तर किष्टु अडपावार ते प्राथमिक शाळेपयंर्त प्रत्येकी २ लाख ६० हजार ८२० प्रमाणे तीनही नाली बांधकामात अनियमितता दिसून आली असून, या कामात तत्कालीन ग्रामसेवक एस. आर. सातूरवार, एम. एस. हेमने, तत्कालीन गटविकास अधिकारी व व्ही. बी. उईके हे तपासात दोषी आढल्याचे तपासात निष्पन्न झाले.