मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड
11 हजारांची मोहाची दारू जप्त, तिघांना अटक
सुशील ओझा, वणी: पाटण पोलिसांनी मांडवी, बेलमपल्ली व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकत 10 हजार 700 रुपयांची मोहाची दारू जप्त केली. तसेच या कारवाईत 5 हजार रुपये नगदी जप्त करण्यात आले. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले. तर मांडवी येथील हातभट्टीचालक फरार होण्यात यशस्वी झाला.
पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांना गावकऱ्यानी मांडवी शिवारात भांडककर यांच्या शेताजवळील नाल्याजवळ एक व्यक्ती गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती दिल्यावरून बिट जमादार अभिमान आडे संदीप सोयाम पोलीस पाटील साचीन कुलसंगे यांनी मिळून धाड टाकली. यात आरोपी फरार झाल. त्याठिकाणी तीन पिप्या प्रत्येकी पाच लिटर मोहमो चा सडवा दारू गळण्या उपयोगी येणारा माल त्याची किंमत ७०० रुपयांचे मिळाले.
८ एप्रिल रोजी बेलमपल्ली येथील राजू मेश्राम यांच्या घरी दारू बाबत पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे अंकुश पातोडे अंकुश दरबत्तेवार मोहम्मद इरफान यांनी घर झडती घेतली असता प्लास्टिक कॅमध्ये ५ हजाराची पाच लिटर गावठी दारू मिळून आली पोलिसांनी दारू जप्त करून आरोपीला अटक केली.
तसेच पाचपोहर येथील वामन टेकाम व प्रेमदास कुमरे हे दोन्ही व्यक्ती गावात गावठी हातभट्टीची दारू विकत असल्याची माहिती मिळल्यावरून ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश मोरे जमादार पिदूरकर, अंकुश, आकाश ननुरवार, राजू गुड्डेवार, नंदू कुंटलवार यांनी पाचपोहर गाठून वंदन वामन टेकाम यांची दारू प्रेमदास कुमरे विक्री करीत असतांना मिळाला व त्याचे जवळून ५ लिटर गावठी दारू व विक्री करिता असतानाचे ५ हजार मिळून आले.
पोलिसांनी पैसे व दारू जप्त करून आरोपीवर कार्यवाही केली. ठाणेदार अमोल बारापात्रे पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यवाही मुळे गावठी हातभट्टी चालकांवर मोठी दहशत पसरली असून दाबे दणाणले आहे.
तळीरामांची फजिती… आता हातभट्टीकडे मोर्चा….
सध्या लॉकडाऊन असल्याने तळीरामांची चांगलीच फजिती होत आहे. काही दिवस अवैध दारू विक्रेत्यांनी त्यांची हौस भागवली. मात्र आता त्यांचाही स्टॉक संपल्याने व कुठे मिळत असल्यास त्याचा रेटही दुप्पट तिप्पट झाल्याने त्यांनाही आता ते परवडेनासे झाले त्यामुळे तळीरामांनी आपला मोर्चा हातभट्टीकडे वळवला आहे.
झरी तालुका आदिवासी बहुल तालुका असून येथील अनेक पोडावर लपून हातभट्टीतून मोहफुलाची दारू काढून विक्री केली जात आहे. ग्रामीण व शहरी भागात दारू मिळत नसल्याने अनेकांनी पोडाकडे धाव घेतली आहे. एक ग्लास दारूची किंमत 40 रुपये असून शहरी भागातील शौकीन 5 लिटरच्या कॅन भरून नेत आहे.