पाटण ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणीपुरवठा

0
सुशील ओझा, झरी: पुरामुळे गढूळ झालेले पैनगंगा नदीतील पाणीपुरवठा पाटणवासीयांना करण्यात येत होता. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ग्रामपंचायतने उपाययोजना करून गावातील सार्वजनिक विहिरीवर मोटारपंप बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा केला. तालुक्यात सात दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. 

पाटण येथील नागरिकांना पैनगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. परंतु नदीला पावसामुळे पूर आल्याने पाणी गढूळ झाले असून दूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने दक्षता घेत पैनगंगा नदीवरून होणारा पाणीपुरवठा बंद केला.

गावातील सार्वजनिक विहिरीवर मोटरपंप बसवून गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनशी जोडून शुद्ध पाणीपुरवठा करण्यात आला. यासाठी सरपंच रमेश हलालवार, सदस्य शेखर बोनगिरवार, समाजसेवक असगर, पाणीपुरवठा कर्मचारी यांनी श्रमदान केले.

.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.