रवि ढुमणे, वणी: मारेगाव महसूल विभागाच्या तहसिलदारांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल, पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा मनमानी कारभार केला असल्याचे वृत्त “वणी बहुगुणी” लावून धरले. या वृत्ताची दखल घेत राज्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मारेगावात दाखल झाले. या बाबतीत ठाणेदार मारेगाव यांच्याशी चर्चा करून निलंबन मागे घेण्यासाठी निवेदन दिले.
फवारणीतून विषबाधा झालेल्या शेतकरी तथा शेतमजूरांचे खापर प्रशासकीय यंत्रणेवर फोडण्याऐवजी मारेगाव तहसीलदारांनी चक्क गावातील कोतवाल व पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा प्रकार केला आहे. यासंबंधी कोतवाल व पोलीस पाटील यांना न्याय मिळवून देण्यासाठी वणी बहुगुणीने वृत्त मालिका लावून धरली. या वृत्तामुळे राज्यातील पोलीस पाटील संघटनेने दखल घेत चक्क मारेगाव गाठले.
सोमवारी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन यांचे वतीने राज्य अध्यक्ष मोहनराव शिंगटे यांचे मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे शिष्टमंडळ मारेगावात दाखल झाले आणि त्यांनी निलंबित कोतवाल आणि पोलीस पाटलांची भेट घेतली. तसंच त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी संबंधीत अधिका-यांशी भेटून पोलीस पाटलांची बाजू मांडली आणि निलंबन मागे घेण्याची विनंती केली.
यावेळी असोसिएशनच्या वतीने जेष्ठ मार्गदर्शक सल्लागार उल्लास मेढे- पाटील कोपरगाव, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनिल धवने पाटील, राज्यपदाधिकारी दिपक गिरी पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रविण राक्षे पाटील, सातारा जिल्हाउपाध्यक्ष विजय थोरात पाटील, जिल्हामार्गदर्शक दिपक जगताप पाटील, जिल्हाकार्यकारणी सदस्य ताजुदिन संन्दे पाटील, कराड दक्षिण तालूका कार्याध्यक्ष राहुल लोंडे पाटील, सदस्य महादेव मंडले पाटील, तालुकाध्यक्ष टेकाम पाटील, पोलीस पाटील निमसरकार व इतर तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थीत होते. सोबतच निलंबित पोलीस पाटील चिकाटे- मारेगाव, सौ आदेवार- टाकळी, वनकर- पिसगाव हे देखील उपस्थित होते.