स्वा.सावरकर शाळेत देशभक्ती पर गीत गायन स्पर्धा
चिमुकल्यांच्या स्वरांनी भारावून गेले वातावरण
वणी: स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील स्वा.सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 मध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी राज्यपुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका प्रीती बिडकर व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मोहसीना खान या होत्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमदास डंभारे यांनी केले. ही स्पर्धा वर्ग 1 ली ते 5 वी पर्यंत ‘अ’ गटात 6 स्पर्धक व वर्ग 6 वी ते 8 वी पर्यंत ‘ब ‘ गटात 9 स्पर्धकांनी भाग घेतला. अ गटात प्रणाली बेताल, श्रावणी चिंचोळकर, व दीप्ती वालदे व गट, ब गटात संजना हिरादेवें व गट, आनंद पिदूरकर व गट, व श्रद्धा चिंतलवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे परीक्षण प्रीती बिडकर व दर्शना राजगडे यांनी केले. संचालन गीतांजली कोंगरे यांनी केले आभार रजनी पोयाम यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी मीना काशीकर, अविनाश तुंबडे यांनी परिश्रम घेतले.