राजूर वेकोली वसाहतीच्या घरात शिरले नालीचे पाणी

वेकोलीकडे तक्रारी करूनही उपाययोजना नाही

0

वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक 6 या वेकोली वस्तीतील नाल्या पूर्ण निकामी झाल्या असल्यानं नालीचे पाणी चक्क तिथं राहणा-या लोकांच्या घरात शिरले आहे. याबाबत सरपंचानं अनेकदा वेकोलीकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र तरी देखील वेकोलीनं कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप सरपंच प्रणिता मो असलम यांनी केला आहे. यावर ग्राम पंचायतीकडून लवकरच तोडगा काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ब्रिटीश कालीन कोळशाची भूमीगत खाण होती. या खाणीत काम करणा-या कामगारांसाठी वेकोलीनं वसाहती तयार केल्या होत्या. आता राजूर येथील कोळशाची खाण बंद झाली आहे. पण लगतच असलेल्या भांदेवाडा येथे नवीन खाण सुरू झाल्यानं या वसाहतीमध्ये राहणारे बहुतांश कामगार भांदेवाडा येथे कार्यरत आहे.

राजूर येथील वार्ड क्रमांक 6 मधील वेकोलीच्या वसाहतीमधील सांडपाणी वाहून नेणा-या नाल्या पूर्णता जिर्ण झाल्या आहेत. याबाबत सरपंच प्रणिता मो असलम यांनी वेकोलीकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पण मंगळवारी झालेल्या पावसामुळे या परिसरातील नाल्या तुडूंब भरल्या आणि नाल्यातील पाणी वसाहतीमधील लोकांच्या घरात शिरले.

ही माहीती मिळताच सरपंच प्रणिता असलम यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व यावर आता ग्राम पंचायतीकडूनच उपायोजना करणार असल्याचे सांगितले. मात्र वेकोलीने यावर कोणत्याही उपायोजना न केल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.