स्वातंत्र्य दिनानिमित्त वणीत गीतगायन स्पर्धा

रविवारी 12 ऑगस्टला स्पर्धेची निवड चाचणी

0

बहुगुणी डेस्क: वणीकरांच्या कलागुणांना वाव मिळावा उद्देशाने संस्कार भारती समिती शाखा वणीच्या वतीने “स्वातंत्र्य दिना” निमित्त दिनांक 17 ऑगस्टला देशभक्ती व भक्तीगीत गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्या निमित्त रविवारी 12 ऑगस्टला निवड चाचणी घेण्यात येत आहे.

ही स्पर्धा तीन गटात घेण्यात येणार आहे. गट अ हा वर्ग 5 ते 7 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर गट ब वर्ग हा वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तिसरा गट हा गट क असून हा गट खुला आहे. या गटात महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच 14 वर्षांवरीव सर्व महिला आणि पुरुषांना यात सहभागी होता येणार आहे.

स्पर्धा निवड चाचणी शुल्क 50 रुपये असून निवड चाचणी 12 ऑगस्ट रविवारी सकाळी 11.00 ते 2.00 दरम्यान वणीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ध्यान मंदिर, महावीर भवन मागे वरोरा रोड येथे घेण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी:

  • ही स्पर्धा केवळ वणी मारेगाव आणि झरी तालुक्यातील लोकांसाठी आहे.
  • स्पर्धकाला गाणे मुखपाठ असणे अनिवार्य.
  • स्पर्धकांनी निवड चाचणीत दोन्ही गाण्याचा मुखडा व एक अंतरा सादर करावा.
  • निवड चाचणीत व स्पर्धेत विषयाला अनुसरून वेशभुषा करणे अनिवार्य.
  • गट अ व गट ब ला शाळेचे ओळखपत्र आणणे अनिवार्य.
  • व्यावसायिक गायक, गायिकांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
  • या अगोदर स्थानिक स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक
  • मिळविलेल्या स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेत येणार नाही.
  • निवड चाचणीत निवडून येणाऱ्या स्पर्धकांनाच दि. 17/8/2018 च्या स्पर्धेत भाग घेता येईल.

नाव नोंदणी व ईतर माहितीसाठी अभिलाष राजूरकर :- 9545357788, 9923837788, अमित उपाध्ये :- 9834917967, 9921625903, गणेश मत्ते : 8378804541 यांना संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.