सुशील ओझा, झरी: बेजबाबदारपणे मोटरसायकल चालवून अपघात केल्या प्रकरणी मार्की येथील रहिवासी असलेल्या प्रवीण गंगाराम जुमनाके याला 1500 रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाच वर्षाआधील ही घटना आहे. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झरी के. जी. मेंढे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
तालुक्यातील प्रकाश हुसेन कनाके व त्याचा मुलगा हे 27 मे 2015 ला एका लग्नाला जाण्यासाठी मांडवा फाटा येथे बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी आरोपी प्रवीण गंगाराम जुमनाके हा बाईकवरून (एमएच 29 – 7284) भरधाव गाडी चालवत होता. त्याने निष्काळजीपणे गाडी चालवत फाट्यावर उभे असलेल्या प्रकाश व त्याच्या मुलाला जोरदार धडक दिली. यात प्रकाश यांच्या पायाला दुखापत झाली तर त्यांचा मुलगा जखमी झाला.
याबाबत प्रकाश हुसेन कनाके यांनी पाटण पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी प्रवीण जुमनाके विरूद्ध भा.दं.वि.चे कलम 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सोयाम यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.
या प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी डॉक्टर अभय विरखेडे व तपास अधिकारी यांचे सह 8 साक्षदारांचे बयान नोंदविण्यात आले. साक्षदारांचे बयान ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस दीड हजार रुपयांचा दंड सुनावला आले. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील पी डी कपूर व कोर्ट पैरवी जमादार सुरेश राठोड व रमेश ताजणे यांनी काम पाहीले