ग्रामसभेत दारू पिऊन धिंगाणा घालणे पडले महागात

विनयभंग केलेल्या आरोपीस कोर्टाची दंडाची शिक्षा

0

सुशील ओझा, झरी: विनयभंग केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी के.जी.मेंढे यांनी आरोपी नामदेव पोचीराम भोकरे यास भादंविचे कलम ३५२ अंतर्गत ५००.रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत हजर राहणे अशी शिक्षा दी. १६ सप्टेंबर २०२० रोजी सुनावली.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील पोलीस स्टेशन मुकुटबन अंतर्गत येणाऱ्या गावातील फिर्यादी लोकप्रतिनिधी होती. २६ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ११.०० वाजता ग्रामसभा आयोजीत केली होती. या ग्रामसभेत आरोपी हा दारु पिऊन फिर्यादी महिलेसोबत वाद करुन हात पकडून ओढले. बांगड्या तोडल्यात व धक्काबुक्की केली.

फिर्यादीने पोलीस स्टेशनला याची तक्रार दिली. यावरून पोलीसांनी आरोपीविरूद्ध भा.दं.वि.चे कलम ३५४, ३२३, ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. सदर गुन्हाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गिरडकर यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले.

प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने फिर्यादी, डॉक्टर त्र्यंबकराव जोगदंड व तपास अधिकारी यांचेसह एकूण सहा साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आलेत. साक्षिदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी. डी. कपूर व कोर्ट पैरवी जमादार रमेश ताजणे व सुरेश राठोड यांनी काम पाहीले

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.