फोनवर बोलताना शिविगाळ करणे भोवले, एकाला तिघांची मारहाण

मित्राशी थट्टा मस्करीत शिविगाळ केल्यातून वाद, सेवा नगर येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: पानटपरीवर खर्रा खाण्यास गेलेल्या एका तरुणाला मित्राचा कॉल आला. कॉलवर तो मित्राशी गप्पा गोष्टी करीत शिविगाळ करत बोलत होता. मात्र ही शिविगाळ करत बोलणे एकाला चांगलेच भोवले. शिविगाळ करीत बोलताना बाजूला उभ्या असलेल्या तरुणाला ती शिविगाळ त्यालाच करीत असल्याचा गैरसमज झाला. त्यातून कॉलवर बोलणा-या व्यक्तीला लाकडी दांड्याने जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तक्रारीनुसार, अनिकेत मनोज मोगरे (25) रा. सेवानगर वणी येथील रहिवासी असून तो नगर पालिकेत काम करतो. त्याच्याच वार्डात आरोपी तरुण संतोष नरपांडे (25) हा राहतो. दिनांक 20 डिसेंबर रोजी दोघांमध्ये शुल्लक वाद झाला होता. त्यानंतर 3 दिवसांनी अनिकेत हा आंबेडकर चौकातील एका पानटपरीवर गेला होता. तिथे त्याला त्याच्या एका मित्राचा कॉल आला. गप्पा गोष्टीत तो मित्राला शिविगाळ करीत बोलत होता.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्याच वेळी पानटपरीवर आरोपी तरुण आला होता. तरुणला वाटले की अनिकेत त्यालाच शिविगाळ करीत आहे. त्यामुळे तरुणने तू कॉलच्या आडून मलाच शिविगाळ करीत असल्याचा आरोप केला. मात्र अनिकेतने त्याला फोनवर मित्राशी बोलतोय आणि त्याच्याची थट्टा मस्करीत शिविगाळ करीत बोलत आहे, असे सांगितले. त्यानंतर तरुण तिथून निघून गेला व अनिकेत देखील निघून गेला. काही वेळाने तरुणच्या मोठ्या वडिलांचा अनिकेतला कॉल आला व त्यांनी तरुणला शिविगाळ का केली अशी विचारणा केली. त्यावर अनिकेतने भेटून बोलू असे सांगितले.

संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास अनिकेत घरी जात असताना वार्डातच त्याला वाटेत तरुण भेटला. दोघांचे बोलणे सुरु असताना तरुणची आई (45) मध्ये आली व तिने मुलाला शिविगाळ का केली अशी विचारणा करीत अनिकेतला मारहाण सुरु केली. याच वेळी तरुणचे काका मनिष शिवलाल नरपांडे (45) हा देखील आला. त्याने अनिकेतला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीत अनिकेतच्या डोळ्याच्या खाली मार लागला.

अनिकेतने पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी तरुण मनोज मोगरे त्याची आई व काका मनिष शिवलाल नरपांडे यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 115 (2), 118 (1) 3 (5) 351 (2), 351(3), 352 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पीएसआय सुदाम असोरे करीत आहे.

(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964

Comments are closed.