भास्कर राऊत, मारेगाव : मृत्यू कोणाला, कधी आणि कसे गाठेल याचा नेम नाही. याची प्रचिती गुरुवारी मारेगाव तालुक्यातील चोपण गावात पाहायला मिळाली. पाऊस सुरु असताना लघुशंकेसाठी तो घराबाहेर निघाला, आणि नेमक्या त्याच वेळी विजेचा कडकडाट होऊन त्याचा अंगावर वीज कोसळली. संतोष महादेव बावणे (44) असे या दुर्देवी घटनांत मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार 23 जून रोजी दुपारी मारेगाव व वणी तालुक्यात आकाशात ढग दाटून आले होते. दुपारी 3 वाजता सुमारास काही ठिकाणी विजेच्या कडाक्यासह पाऊस सुरु झाला. अशातच चोपण गावातील संतोष वावणे हा आपल्या कुटुंबासह घरातच होता. दुपारी 4 वाजता दरम्यान संतोषला लघुशंका जाणवली म्हणून अंगणात असलेल्या बाथरूमकडे जाण्यासाठी तो खोलीतुन बाहेर पडला.
मात्र बाथरूम पर्यंत पोहचण्यापूर्वीच जोरदार कडाक्यासह त्याचा अंगावर विज कोसळली. घरात असलेल्या कुटुंबियांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतक संतोष बावणे शेतमजुरी करून उपजीविका चालवत होता. त्याच्या मागे पत्नी, दोन मुलं व वृद्ध आईवडील आहे.
Comments are closed.