नगरपरिषद आरोग्य निरीक्षकाला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

जत्रा मैदान परिसरात अतिक्रमण काढताना मांस विक्रेता सूरा घेउन आला अंगावर

जितेंद्र कोठारी, वणी : न.प. मुख्याधिकारी यांचे आदेशाने अतिक्रमण काढायला गेलेल्या आरोग्य निरीक्षकाला अतिक्रमण धारक दुकानदारांनी शिवीगाळ केली तसेच मांस कापण्याचा सुरा घेउन आरोग्य निरीक्षकाच्या अंगावर धावून गेला. सदर घटना दि.22 जुन रोजी सायंकाळी 4 वाजता दरम्यान जत्रा मैदान भागात घडली. याबाबत नगरपरिषद आरोग्य निरीक्षक भोलेश्वर ताराचंद यांनी गैरअर्जदार रोशन बाळू लोणारे विरुद्ध वणी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याची तक्रार दिली आहे.

नगरपरिषद क्षेत्र अंतर्गत आठवडी बाजार व यात्रा मैदान परिसरात आरक्षित जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्याचे माजी नगरसेवक पी.के.टोंगे यांनी वारंवार मौखिक व लेखी तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापन 2016 अनव्ये नोटीस तयार करून अतिक्रमणधारकांना देण्यात आले होते.

बुधवार 22 जून रोजी अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत सिमेंट रस्त्यावर अनधिकृत मांस विक्री करणाऱ्या रोशन लोणारे याना दुकान हटविण्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगितले असता रोशन लोणारे यांनी उद्धट भाषेत शिवीगाळ केली. तसेच मांस कापण्याचा सुरा घेऊन अर्जदार यांच्या मारण्यासाठी धावून गेला. मात्र तिथे उपस्थित कर्मचारी व नागरिकांनी मध्यस्थी करुन 112 नंबर वर कॉल केला.

दि. 27 जून पासून राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान गैरअर्जदार कडून जीवितास धोका असल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 294, 186 व 506 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!