रंगनाथ स्वामी निवडणुकीत ‘परिवर्तन’ची ‘जय सहकार’ला धोबीपछाड..?
परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद
बहुगुणी डेस्क : वणी येथील नावाजलेली श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेची निवडणूक दोन्ही पॅनेलसाठी आता प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. प्रायव्हेट लिमिटेड कम्पनी समजून संस्था चालविणाऱ्या जय सहकार पॅनेलच्या कर्त्याधर्त्याना या निवडणुकीत परिवर्तन पॅनल कडून धोबीपछाड मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणुकीला अवघ्या तीन दिवस शिल्लक असताना परिवर्तन पॅनलने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार वामनराव कासावर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ता परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना विजय मिळवून देण्यासाठी परिश्रम घेत आहे.

पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी काही संचालकांचा विरोध झुगारून नियमबाह्य कर्ज वाटप केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच पतसंस्थेच्या सभासदांना अंधारात ठेवून करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. याबाबत सखोल बातमी वणी बहुगुणीच्या उद्याच्या अंकात अवश्य वाचा.
हे देखील वाचा-
‘परिवर्तन’साठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या फिरताहेत डोअर टू डोअर
