फोटो स्टुडिओ सकाळी 11 ते 5 पर्यंत सुरू ठेवू देण्याची मागणी
वणी फोटोग्राफर एकता मंच तर्फे निवेदन
जब्बार चीनी, वणी: मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे छायाचित्रकारांचा व्यवसाय पूर्णतः बंद होता. त्यामुळे छायाचित्रकारांना या वर्षीच्या हंगामामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र याही वर्षीच्या लाॅकडाऊनमुळे फोटोग्राफी व्यवसाय अडचणीत सापडला. फोटोग्राफरकड़े या व्यवसायाव्यतिरिक्त दूसरे कोणतेही मिळकतीचे साधन नाही.
या व्यवसायावर त्यांचा परिवार अवलंबून आहे. फोटोग्राफर हा समाजाचा महत्वाचा घटक असून शासकीय, निमशासकीय, लग्न सोहळा, व इतरही प्रत्येक कार्यात फोटोग्राफर लागतोच. तसाही आज मोबाइलमुळे फोटोग्राफी व्यवसाय मोडकळीस आला आहे.
तसेच फोटोग्राफरला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ किंवा अनुदान मिळत नाही. त्यांनी कधीही शासनाकडून अशी कोणतीच अपेक्षाही ठेवलेली नाही. मात्र फोटोग्राफरला आत्मसन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांची दुकाने कमीत कमी 11 ते 5 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.
अशी मागणी फोटोग्राफर एकता मंचच्या वतीने करण्यात आलेली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले. त्याची एक प्रत जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. या लाॅकडाऊनला वणी फोटोग्राफर एकता मंचचा विरोध आहे. दुकाने चालु ठेवण्याकरीता काही प्रमाणात शिथिलता देण्यात यावी अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा