झरी येथील महावितरण अभियंते व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव

ग्राहक सेवा व महसुलाचे उत्कृष्ट काम केल्यामुळे सन्मान

0

सुशील ओझा, झरी: सरलेले आर्थिक वर्ष २०-२१ मध्ये महावितरण उपविभाग झरी जामणी तर्फे कोरोना महामारीच्या संकट काळात देखील वीज ग्राहकांना चांगली सेवा देऊन महसुल वसुलीचे ९८ टक्के उद्दिष्ट गाठण्यास हातभार लावणार्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

आजच्या आधुनिक जगात वीज ही एक जीवनावश्यक बाब आहे. विजेशी वीज ग्राहकाचा २४*७ संबंध असतो. अशावेळी विजे विषयीची समस्या लवकरात लवकर सोडविणे आवश्यक असते. त्याचवेळी वीज ग्राहकांनी देखील आपले वीज बील वेळेच्या आत व नियमितपणे भरणे गरजेचे असते. महावितरण तर्फे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना अनेक सोयी सुविधा मोबाईल वरच उपलब्ध करुन दिलेल्या आहे. विजेच्या तक्रारी देण्यापासून तर वीज मीटरचे रीडींग, बिलाची रक्कम,भरणा दिनांक तसेच ऑनलाईन पद्धतीने घरुनच वीज बील भरण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे.याचा ग्राहकांनी वेळोवेळी लाभ घ्यावा.

आर्थिक वर्षे २०-२१ करिता महावितरण झरी जामणी उपविभागाची वीज बिलाची मागणी १३.५२ कोटी रु होती. त्यापैकी १३.२२ कोटी रु ची वसुली म्हणजे सुमारे ९८ टक्के वसुली करण्यात आली. वीज बील भरणा करणाऱ्या सर्व ग्राहकांचे आभार मानून वसुलीसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्व अभियंते व कर्मचार्यांचा गौरव करण्यात आला. वसुलीकरीता मुख्य अभियंता सुचित्रा गुजर, अधिक्षक अभियंता सुरेश मडावी व कार्यकारी अभियंता मंगेश वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांनी सांगितले.

सद्याच्या कृषी वीज धोरण-२० नुसार ग्रा पं निहाय वसूल झालेल्या रकमेतून संबंधित ग्रा. पं क्षेत्रात वीज यंत्रणा मजबुत करण्यासाठी कामाचे अंदाजपत्रक तयार करणे सुरु असून लवकरच ही कामे होणार आहेत. त्यामुळे कृषी ग्राहकांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घेऊन “आपला पैसा,आपल्या कामी ” यानुसार आपल्या भागातील विजेचे जाळे मजबूत करण्यास सहकार्य करावे व आपले कृषी वीज बील कोरे करावे असे आवाहन सहाय्यक अभियंता मसुद शेख यांनी केले आहे.

हे देखील वाचा:

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

आयपीएल सुरू, वणीत सट्टेबाजी सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.