विद्यार्थी खेळाडुंसाठीच्या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

अत्याधुनिक मशिनद्वारे विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी

0

विवेक तोटेवार, वणी: रविवारी वणीतील वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये पोलीस भरती, सैन्य भरती व खेळाडुंसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात सुमारे 300 शिबिरार्थीने सहभाग घेतला. नागपूर येथील सुप्रसिद्ध स्पोर्ट मेडिसिन आणि फिटनेस तज्ज्ञ डॉ. सतीश सोनार व सुप्रसिद्ध खेळ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष कुथे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिबिरार्थ्यांना आवश्यक त्या औषधीचं वाटप करण्यात आलं. या शिबिराचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी केले.

सकाळी विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी करण्यात आली. यात त्यांची धावण्याची क्षमता, फुफ्फुसाची मर्यादा याविषयी चाचणी घेण्यात आली. फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. अभिषेक गौरकर यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यानंतर दुपारी 11 वाजता वणीतील वसंत जिनिंग येथे मार्गदर्शन शिबिराला सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र लोढा यांनी केले.

मार्गदर्शन शिबिरात डॉ. सतीश सोनार शारीरिक क्षमता कशी वाढवावी, सराव करताना दुखापती झाल्यास काय करावे, अनेकदा धावतांना पायाला सूज येते. अशावेळी विद्यार्थ्यांनी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. डाएट हा खेळाडुंचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे कोणता आहार असावा. कोणता आहार टाळावा याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनेकदा शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी किंवा चुकीने काही औषधी घेतल्या जातात मात्र त्या औषधी डोपिंग टेस्ट मध्ये येत असल्याने विद्यार्थ्यांचे अशा वेळी कोणत्या औषधी टाळाव्यात याचे ही त्यांनी मार्गदर्शन केले.

खेळ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष कुथे यांनी मुलाखतीच्या वेळी काय काळजी घ्यावी. खेळताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध खेळाडुंचे उदाहरण देऊन ते कशा पद्धतीने मानसिक स्वास्थ टिकवून ठेवतात याविषयी माहिती दिली. तसेच मुलाखतीसाठी मनाची तयारी कशी करावी. हावभाव कसे असावे. याशिवाय मानसिक स्थिती योग्य ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करावे याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये अत्याधुनिक मशिनद्वारे विद्यार्थ्यांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कमतरतेविषयी मार्गदर्शन करून त्यांना औषधी देण्यात आली. विद्यार्थ्यांनी केलेल्या आग्रहास्तव पुढे 21 ऑक्टोबरला डॉ. सतीश सोनार यांच्यासह फिजिकल फिटनेस ट्रेनर व फिजिओथेरपिस्ट विद्यार्थ्यांची शासकीय मैदानावर शारीरिक चाचणी घेऊन मैदानावरच्या होणा-या ऍक्टिव्हिटीविषयी प्रत्येक विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जाणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी विजय लगारे, डॉ. दिलीप मालेकर, प्रा. रविंद्र मत्ते, डॉ. सुबोध अग्रवाल, डॉ. गोहोकार होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजयाताई आगबत्तलवार, संगीता खटोड, सिराज सिद्धीक्की, स्वप्निल धुर्वे, सोनू निमसटकर, राजू उपरकर, रवि येमुर्ले, सूर्यकांत खाडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रते, पदाधिकारी व लोढा हॉस्पिटलच्या चमुने परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.