नांदेपेरा जवळील “तो” खड्डा जीवघेणाच ! अपघाताची शक्यता

ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्याची दैना, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: नांदेपेरा येथील पुलावर मोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा एवढा मोठा पडला आहे की जर वेगाने एखादे वाहन आले आणि त्याला जर या जीवघेण्या खड्याचा अंदाज आला नाही तर मात्र मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देईल का असा सवाल या मार्गावरून सातत्याने प्रवास करणारे प्रवासी करीत आहे.

वणी ते नांदेपरा मार्गे मार्डी हा मार्ग नागपूर हैद्राबाद महामार्गला वडकी येथे जाऊन मिळतो. हा मार्ग वणीवरून हिंगणघाट येथे जाण्यासाठी हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गांवर मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते. तसेच वणी आणि मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावरील रेतीच्या ट्रकमुळेही येथील वाहतूक सारखी सुरु असते. तसेच कोळशाचीही मोठी वाहतूक या मार्गाने होत असते.

अशातच नुकतेच नांदेपेरा ते खैरी असे या मार्गाचे काम करण्यात आले. परंतु वाहतूक मोठया प्रमाणावर वाढल्याने या मार्गांवर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. नांदेपेरा येथील पुलावर मोठा खड्डा पडला आहे. हा खड्डा दुरून येणाऱ्या वाहनधारकाला दिसून पडत नाही. त्यामुळे जवळ आल्याबरोबर जर वाहणाचे ब्रेक मारल्यास अपघात होण्याची शक्यता असते.

छोटे वाहन येथे पडल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. पण याकडे कोणत्याही पदाधिकारी तथा अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. हा खड्डा असाच राहिल्यास येथे मोठया प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील वाचा:

रॉकेट्री: द नांबी इफेक्ट… सुजाता थिएटरमध्ये रिलिज, सत्य घटनेवर आधारीत

बेंबळा प्रकल्पाच्या सदोष कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.