वणी ते नांदेपेरा रोडची चाळण, तात्काळ दुरुस्तीची मागणी

फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्त्वात निवेदन, मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी (साई मंदिर) ते नांदेपेरा (नांदेपेरा) चौफुली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली असून यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रत्यावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य झाले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशांची चांगलीच दमछाक होत असून त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.

वणी नांदेपेरा रोडवर अनेक शाळा, महाविदयालय उद्योग, व्यायामशाळा आहेत. तसेच अनेक गावे या मार्गावर आहेत. या गावातील अनेकांचे शेती, शिक्षण व बाजारासाठी वणीला ये-जा असते. तर अनेक वृद्ध व युवा या नांदेपेरा चौफुली पर्यंत शतपावली साठी जातात. मात्र या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक लहान सहान अपघात होत आहे. तर उडणाऱ्या धुळीमुळे प्रवाशांना व परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता केतन परतानी यांना निवेदन देऊन रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. येत्या 8 दिवसात या रस्त्याची न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना मयूर गेडाम, अंकुश बोढे, हिरा गोहोकार,  प्रदिप बदखल,  विजय चोखारे, प्रवीण कळसकर, सागर लखपती,  संदीप बदखल,  राहुल देवनपल्लीवार आदी महाराष्ट्र सैनिकांची उपस्थिती होती.

Comments are closed.