रंगारंग कार्यक्रमासह पोदार लर्न स्कुल समर कॅम्पचे समापन

चिमुकल्यांचे डान्स पाहून आनंदित झाले अभिभावक

जितेंद्र कोठारी, वणी : प्रख्यात पोदार इंटेनेशनलचे उपक्रम मार्कंडेय पोदार लर्न स्कुलमध्ये आयोजित समर कॅम्पचे मंगळवार 21 जून रोजी समापन झाले. यावेळी रंगारंग डान्स व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समर कॅम्पमध्ये सहभागी मुलं मुली व त्यांचे अभिवावक या कार्यक्रमात हजर होते. चिमुकल्यांनी केलेले ग्रुप डान्स व एकल नृत्य पाहून अभिभावक आनंदित झाले. समर कॅम्प मध्ये सहभागी चिमुकल्याना प्रमाणपत्र व उपहार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

दि. 13 जून ते 20 जून पर्यंत आयोजित समर कॅम्प मध्ये मुलांना सेल्फ डिफेन्स, स्केटिंग, एरोबिक्स, डान्स, झुंबा, कॅलीग्राफी, पर्सनलिटी डेव्हलपमेंट, चित्रकला इत्यादींचे धडे शिकविण्यात आले. मार्कंडेय पोदार शाळेच्या प्रिन्सिपल लता रफेल यांच्या मार्गदर्शनात शाळेतील पाटील, त्रिवेदी, देशमुख व इतर शिक्षिका यांनी समर कॅम्प व समापन कार्यक्रमात सहयोग केले. कोरियोग्राफर गौरव यांनी चिमुकल्याना डान्स शिकविले. कार्यक्रमाची अध्यक्षता शाळेचे संस्थापक रमेश सुंकुरवार यांनी केली. यावेळी सविता रमेश सुंकुरवार, राहुल सुंकुरवार, प्राची राहुल सुंकुरवार, कुणाल सुंकुरवार, पूनम कुणाल सुंकुरवार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची शानदार अँकरिंग मोहना वानखेडे व स्तुती यांनी केली.

प्री प्रायमरी शिक्षण पासून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे. तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा ज्ञान असावा. या दृष्टिकोणातून वणी येथील प्रख्यात कंत्राटदार रमेश सुंकुरवार व त्यांचे सुपुत्र राहुल सुंकुरवार यांनी वणी घुग्गुस मार्गावर मार्कंडेय पोदार लर्न स्कुलची स्थापना केली. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया शाळेत सुरु आहे. प्रशस्त व हवादार क्लासरुम, प्ले रुम, शुद्द पेयजल व भव्य क्रीडांगणसह स्कुल बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Comments are closed.