दहेगाव येथे मजूर दांंपत्याने केले विष प्राशन

वणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील दहेगाव (घोन्सा) येथील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याने विष प्राशन केले. ही घटना दि. 30 शुक्रवारी सकाळी घडली. पती – पत्नीला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र पतीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

बंडू नामदेव क्षीरसागर (48) आणि सुवर्णा बंडू क्षीरसागर (45) असे विष प्राशन करणाऱ्या दांपत्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान पती पत्नीच्या वादातून पत्नीने विष प्राषण केलेे. पत्नीपाठोपाठ पतीनेही घाबरून विष प्राशन केले. घरच्यांच्या लक्षात येताच दोघांनाही उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र बंडूची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. विष प्राशन करण्याचे कारण कळू शकले नाही. मात्र त्यांच्यात कौटुंबिक कलहातून सारखे वाद व्हायचे. अशी माहिती आहे. सदर दांपत्याला दोन मुले आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.