वणीच पोळा उत्साहात साजरा

बैल सजावट स्पर्धा ठरले प्रमुख आकर्षण

0

विवेक तोटेवार, वणी: वणीत पोळा उत्सव समितीद्वारा शासकीय मैदानावर पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या या कार्यक्रमात शेतकऱ्यांने मोठ्या प्रमाणात बैलांच्या जोड्या आल्या होत्या. विविध प्रकारे सजवलेल्या बैलजोड्या या कार्यक्रमाचे आकर्षण होते. तर अनेक शेतकऱ्यांने सादर केलेल्या ‘गण’ या लोकगितामुळे मैदानावरील वातावरण भक्तीमय झाले होते. यावर्षी उत्सवावर पावसाचे विरजण आल्याने गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी लोकांचा उत्साह कमी दिसून आला.

कार्यक्रमात बैल सजावट स्पर्धाही घेण्यात आली. यात श्री बिलोरिया व शंकर आवरी यांना उत्कृष्ट बैलजोडी सजावटीसाठी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पोलीस पाटील नितीन शिरभाते, प्रमोद निकुरे, राजाभाऊ पाथ्रटकर यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिकांनी बैलांचे पूजन केले. यावेळी वणीतील नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोळा उत्सव समितीचे सुरेंद्र नालमवार, विकेश पानघाटे, अमर चौधरी, अमित उपाध्ये, रवि धुळे, राहुल खारकर, विकास देवतळे, सृजन गौरकार, श्रीकांत ठाकरे, अक्षय देशपांडे, आशिष पावडे, शरद खोंड, परितोष पानट, किसन कोरडे, आकाश सूर, अक्षय देठे, वैभव मेहता, महेश लिपटे या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांचे आणि वणीतील नागरिकांचे पोळा उत्सव समितीने आभार मानले.
Leave A Reply

Your email address will not be published.