शिरपूर पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

दोघांकडून 12 हजाराचा मुद्देमाल जप्त

जितेंद्र कोठारी, वणी : अवैधरित्या विनापरवाना देशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहितीवरून शिरपूर पोलिसांनी मंगळवारी दोन इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून देशी दारूचे 400 पव्वे जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

कळमना रोडवरील हनुमान मंदिराजवळ व शींदोला येथील जीनिंग समोर करण्यात आलेल्या कारवाईत शिरपूर पोलिसांनी सुनील नारायण उइके, रा. वणी व शेख जावेद अब्दुल सलाम रा. शास्त्रीनगर वणी या दोघांकडून 90 एमएल दारुचे 400 पव्वे किंमत 12 हजार जप्त केले. नापोका निलेश केशव भुसे यांच्या फिर्यादवरून दोन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल कण्यात आले आहे.

Comments are closed.