वणी: अलिकडेच शहरात दुचाकी आणि मोबाईलचोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. मोबाईलचोरीनं आणि दुचाकी चोरीनं सर्वसामान्य त्रस्त झाले होते. वणीत अशाच एका दुचाकी आणि मोबाईल चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे.
शहरातील रामपुरा भागात एक तरुण दुचाकीनं संशयितरित्या फिरत होता. त्यावळे गस्तीवर असलेले ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस, उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे,सुधीर पांडे यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव आकाश सुरेश मेश्राम (२६) रा. रामपुरा वार्ड अशी माहिती दिली. त्याच्या जवळून दोन यामाहा कंपनीच्या दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या एका दुचाकीवर नंबर नाही, तर दुस-या दुचाकीचा एम एच 31 इ ६८४६ असा नंबर आहे. ५५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी व १८ हजाराचे ५ मोबाईल असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिसांनी केली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.