वणी पोलिसांची जुगार अड्यावर धाड

एकता नगरमधील घटना, 5 आरोपींना अटक

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील एकतानगर येथे एका घरी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शनिवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जुगार खेळताना चार जणांना रंगेहात पकडले. य प्रकरणी घरमालकासह पाच जणांना अटक करण्यात आली.

शनिवारी संध्याकाळी पेट्रोलिंग करताना पोलिसांना खब-याकडून एकतानगरमध्ये एका घरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी शेख अकील शेख शाहीद यांच्या घरी धाड टाकली. त्यावेळी आरोपी शेख मोहसिन शेख सलाम (48) रा. एकतानगर, शेख सलिम शेख मैनोद्दीन (40) रा. शात्रीनगर, शेख जुबेर शेख शमशीर (30) रा एकतानगर, राकेश रामक्रिष्ण बिडकर (32) रा. एकतानगर हे जुगार खेळताना दिसले. पोलिसांनी यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 2130 रुपये नगदी, एक पत्त्याची कीट असा एकून 2180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रातिनिधिक फोटो

या प्रकरणी या चार जणांसह ज्या व्यक्तीच्या घरी जुगार सुरू होता त्यालाही अटक करण्यात आली आहे. या सर्वांवर जमावबंदी, संचारबंदी, आपत्ती व्यवस्थापन, जुगार प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम मसुकाच्या कलम 4, 5 व भादंविच्या कलम 188, 269 आपत्ती व्यवस्थापन कायदा 51 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही एसडीपीओ सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो नि वैभव जाधव, डीबी प्रमुख पोउनि गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिलीप वांड्रसवार, अमित पोयाम यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.