झोला फाट्यावर पोलिसांनी पकडला अडीच लाखाचा टँगो पंच

बेरोजगार तरुण वळत आहेत दारू तस्करीकडे

0
रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चंद्रपुरात अवैधरित्या  कारमध्ये दारू घेऊन जाणाऱ्या दारू तस्कराला अडीच लाखाच्या मुद्देमालासह वणी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाली अन बहुतांश युवक वर्ग अवैध दारू तस्करीच्या व्यवसायात ओढला गेला. दररोज पोलिसांची चुकामुक करून भरमसाठ प्रमाणात वणीतून चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहून नेल्या जात आहे.
असाच प्रकार गुरुवारला घडला. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी हे पोलीस कर्मचाऱ्या समवेत सकाळी साडेसहा वाजता चे सुमारास गस्तावर असतांना ठाणेदारांना वणीतून पांढऱ्या रंगाचे कार मध्ये दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली.  त्यानुसार ठाणेदार कुळकर्णी यांनी  उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार वासू नारनवरे, प्रभाकर कांबळे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, शेख नफिस, सुधीर पांडे,सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव यांना सोबत घेऊन झोला फाट्याजवळ सापळा रचला.
माहितीनुसार वणीकडून पांढऱ्या रंगाची कार येतांना दिसताच पोलिसांनी एम एच 34 के 6406 या कार ला हात दाखवून थांबविले. सदर कारची झडती घेतली असता कारमध्ये आठ प्लास्टिकच्या बोरी मध्ये दोन हजार टँगो पंच दारूच्या ५२ हजार रुपये किमतीच्या बाटल्या आढळून आल्या. चालकांची अधिक तपासणी केली असता मनी अण्णामलाई शेट्टी ६२ रा घुटकाळा चंद्रपूर याला ५२ हजार रुपये किमतीची दारू व दोन लाख रुपये किमतीची कार असा एकूण दोन लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.