मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरात दोन ठिकाणी धाड, 3 आरोपींना अटक

0

विवेक तोटेवार, वणी: रविवारी मध्यरात्री वणी पोलिसांनी शहरातून चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करणा-यांवर कारवाई केली. या कारवाईत 2 वाहने जप्त करण्यात आले तर 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

वणी शहरातील अशोक बाजारजवळ एका वाहनातून दारू तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या डीबी पथकाला मिळाली. त्यानुसार रविवारी मध्यरात्री दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सापळा रचला. रात्री 2 वाजताच्या सुमारास या ठिकाणी रेनॉल्ट डस्टर वाहन (MH26 AK1006) तिथे पोहोचले. या वाहनाची तपासणी केली असता या वाहनाच्या डिक्कीत 10 देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. सदर वाहन जप्त करण्यात आले.

दुसरी कारवाई एक तासानंतरच करण्यात आली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील साई मंदिराच्या मागे मारोती रिट्स या चारचाकी वाहनात 19 पेट्या 49400 रुपयांची देशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन जप्त केले. या दोन्ही कारवाईत महेश कांबळे, अजय शर्मा, राहुल चवरे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 (अ) (इ) नुसार गुन्हा नोंद केला आहे.

या दोन्ही कारवाईत दोन चारचाकी वाहन, देशी दारू, मोबाईल अस एकूण 8 लाख 80 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई ही वणी पोलिसांची दारू तस्करांवर मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे.

सदर कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शिवाजी टिपूर्णे, प्रदीप ठाकरे, विजय वानखेडे, इकबाल शेख, रवी इसनकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार इ. यांनी केली.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)

 

Leave A Reply

Your email address will not be published.