मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काका व दीदी उपक्रम

विद्यार्थ्यीनींना त्रास देत असणा-यांबाबत तक्रार करण्याचे आवाहन

0

सुशील ओझा, झरी: आजच्या युगात पोलिसांप्रती जनसामान्य जनतेत वेगळीच प्रतिमा असून पोलिसांच्या कार्य पाहून व पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सुद्धा जनतेला भीती वाटते. पोलीस जनतेच्या सुरक्षेकरिता असतात याची माहिती असून ही जनसामान्यांमध्ये पोलिसांबाबत भीती असते. ज्यामुळे पोलिसांच्या देखील कामात मोठी अडचण निर्माण होत आहे. “पोलीस जनतेचा शत्रू नसून मित्र” आहे या उद्देशाने मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मातोश्री पुनकाबाई विभाजक माध्यमिक आश्रम शाळा व विजाभज कनिष्ठ महाविद्यालय येथे ३० जुलै रोजी पोलीस काका व पोलीस दीदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रचे अध्यक्ष- मानद सचिव जय बजरंग शिक्षण संस्था प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक पोलीस उपनिरीक्षक वनदेव कापडे , प्रमुख उपस्थिती प्रा एस. के. परचाके व पोलीस काका म्हणून अशोक नैताम पोलीस दीदी म्हणून महिला पोलीस मेश्राम व कु उदकवार होते. प्रमुख मार्गदर्शक पीएसआय कापडे यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना पोलीस हा कुणाचा शत्रू नसून मित्रच असतो कुणाचा भाऊ तर कुणाचे वडीलच असते. आम्ही पोलीस खात्यात असल्यामुळे आम्हाला कायद्याच्या चाकोरीत राहून काम करावे लागते तर चोरांना पोलिसगिरी दाखवावी लागते याचा अर्थ पोलीस खराब आहे असे नाही असे प्रतिपादन केले.

तर शालेय विद्यार्थ्यांना व मुलींना कुणी छेडखनी करीत असेल किंवा त्रास देत असेल तसेच कोणत्याही विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास देत असुन गुन्हेगारीत ओढत असेल तर त्यांची माहिती पोलिसांना न भीता द्या त्याकरिता मुलांकरिता पोलीस काका व दीदी म्हणून व तुमच्या सर्वच समस्या जाणून घेण्याकरिता काका जमादार अशोक नैताम व दीदी म्हणून महिला पोलीस मेश्राम म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही तक्रार असल्यास आपल्या काका व दीदी याना सरळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात गणेश उदकवार यांनी पोलीस आपले मित्र भाऊ असून त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात शाळा महाविद्यालयातील शेकडो मूल व मुली उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दूर्लवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविना उदकवार यांनी मानले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.