मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटलांची बैठक

सण उत्सवाबाबत ठाणेदारांनी केले मार्गदर्शन

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोळा, ईद, गणपती व दुर्गोस्तव निमित्त पोलीस पाटलांची बैठक झाली. येणाऱ्या सण उत्सवोदरम्यान कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उदभवणार नाही या बाबत काळजी घेणे. तसेच शेतमजूर फवारणी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सण उत्सवादरम्यान अनेक समाजकंठक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, गावातील सामाजिक सलोखा बिघडवणा-यांनी माहिती देणे, गावातील उपद्रवी लोकांची यादी, बाहेर गावातून आलेल्या नवीन कुटुंबाची माहिती देणे, तसेच गावात अवैध दारू विक्री करून गावातील शांतता भंग करणाऱ्यांची माहिती देणे याबाबत ठाणेदार धनंजय जगदाळे व पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस स्टेशन अंर्तगत येणाऱ्या सर्व पोलीस पाटील उपस्तीत होते. बैठकीचे नियोजन नीरज पातूरकर व प्रदीप कवरासे यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.