विवेक तोटेवार, वणी: वागदरा येथे रविवारी कोंबड बाजार फुलला होता. या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. तर इतर जुगारी पळून जाण्यात यशस्वी झाले. या ठिकाणी तीन दुचाकींसह एकूण 1 लाख 51 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेले आरोपी हे बाहेरगावातील आहेत. त्यामुळे वागदरा येथील कोंबडबाजारावर दुरदुरचे शौकिन येत असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी दिनांक 5 जानेवारी रोजी तालुक्यातील वागदरा येथे कोंबड बाजार सुरु होता. दुपारी याची माहिती खबरीद्वारा पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून दुपारी दोन वाजताच्या सुमारास वणी पोलीस वेश बदलून वागदरा येथील महालक्ष्मी माता मंदिराजवळ गेले. तिथे त्यांना काही ईसम जोरजोराने ओरडत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी काही ईसम दोन कोंबड्याची झुंज लावून ते जुगार खेळत होते.
पोलिसांनी धाड टाकटाच एकच घटनास्थळावर एकच पळापळ झाली. पोलिसांनी जुगा-यांचा पाठलाग केला. अधिकाधिक लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र दोन आरोपी संकेत मोहन बलकी (20) रा. उकणी व वकील हुसैन कुरेशी (38) रा. मारेगाव हे पोलिसांच्या हाती लागले. या दोघांवर त्यांच्यावर कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटास्थळावरून तीन दुचाकी (MH 29 AC 8460) (MH34 AD 9173) व (MH 29 BU 5199), दोन कोंबडे, दोन काथ्या व रोख रक्कम असा सुमारे 1 लाख 51 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल बेहारानी यांच्या मार्गर्शनाखाली गजानन डोंगरे करीत आहे.
(रेग्लुलर बातमी व अपडेटसाठी खालील लिंकवर क्लिक करून वणी बहुगुणीचा फेसबूक गृप जॉइन करा.. )
https://www.facebook.com/groups/241871233000964
Comments are closed.