फरार रेती तस्कराच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना अद्याप अपयश

मोबाईल लोकेशन तंत्रज्ञान ठरत आहे कुचकामी

0

वणी बहुगुणी डेस्क: तस्करीतील रेती पकडण्यासाठी गेलेल्या महसूल अधिका-यांना धमकी देणा-या व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप असलेल्या रेती तस्कर उमेश पोद्दार याच्या मुसक्या आवळण्यास अद्याप पोलीस प्रशासनाला यश आलेले नाही. कारवाईस दिरंगाई होत असल्याने पोलीस जाणून बुजून तर या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत नाही अशी चर्चा आता शहरात जोर धरत आहे.

महसूल अधिकाऱ्यांना धमकी देऊन बळजबरीने रेती भरलेला ट्रक अवैधरित्या खाली करणाऱ्या वणी येथील तस्कराविरोधात 21 मे रोजी गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. गणेशपूरचे मंडळ अधिकारी महेंद्र देशपांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी उमेश पोद्दार रा.वणी यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेनंतर आरोपी फरार होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे 7 दिवसांनंतर आरोपीला जामीन मिळाला. यावेळी आरोपी शहरात फिरत असूनही पोलिसांनी जाणून बुजून त्याला अटक केली नाही असा आरोप शहरात केला जात होता. दिनांक 10 जून रोजी आरोपीची अंतरिम जमानतीची तारीख संपल्यानंतर पोलिसांच्या नाकावर टीच्चून आरोपी पुन्हा फरार झाला आहे.

संग्रहित फोटो

मोबाईल लोकेशन तंत्रज्ञान ठरले कुचकामी…
सध्या मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. अऩेक आरोपीच्या मुसक्या केवळ मोबाईल लोकेशनच्या आधारावर आवळल्या आहे. मात्र रेती तस्कर उमेश पोद्दारच्या मोबाईलचे लोकेशन काही पोलिसांना गवसत नाहीये. त्यामुळे मोबाईल तंत्रज्ञान कुचकामी ठरत तर नाहीये याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे महसूल विभागानेही या प्रकरणाचा पाठपुरावा केला नसल्याची चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.