अवैध धंद्यांची आता खैर नाही – डॉ. भुजबळ 

कोरोनाकाळात सण, उत्सव साजरे करण्याचे सांगितले तंत्र

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण, उत्सव हे शांतता व सलोख्याची जी वणी शहराची परंपरा आहे ती कायम राखत साजरे करावेत. कायदा व सुव्यस्था अबाधित राखून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सण, उत्सव साजरे करून पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी केले. मंगळवारी शेतकरी मंदिरात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. अवैध धंद्यांची खैर नाही. त्यांचा नायनाट करू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

या बैठकीत वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, तहसीलदार शाम धनमणे, प्रभारी मुख्याधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण व कार्यक्रमाचे अध्यक्ष हे यवतमाळ येथे नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ हे होते. बैठकीच्या सुरवातीला स्वागत समारंभ पार पडल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांनी कोविडच्या काळात वणीकरांनी जी मदत केली. त्याबाबत वणीकरांचे कौतुक केले. कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे अशी सूचना केली.

नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी शहरात सर्व महापुरुषांची जयंती व विविध उत्सव हे नेहमीच शांततेत व सलोख्याने साजरे करण्याची परंपरा असल्याचे सांगितले. येणारे सण, उत्सव हे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून पार पाडले जातील अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी शांतता समितीचे सदस्य राजा पाथ्रडकर, रज्जाक पठाण, पुरुषोत्तम पाटील, नईम अजीज, देवराव धांडे यांनी प्रशासनाला काही सूचना केल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक यांचा विविध सामजिक संघटना व नागरिकांनी सत्कार केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यात्मिक नागरी, औद्योगिक नागरी, डायमंड सिटी असा वाणीचा उल्लेख केला. त्यांना आपले कर्तव्य बजावताना आलेले अनुभव वणीकरांसमोर बोलून दाखवले. यात सैलानी बाबांची यात्रा, पंढरपूर येथील वारी कोरोनामुळे यावर्षी स्थगित करण्यात आली.

यात भाविकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले. पुढे ते म्हणाले की, विविधतेत एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्यं राहिले आहे. कोरोना काळात याची प्रचिती आली. वणीत नव्याने रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी संजय  पुज्जलवार यांनी वणीत दुर्गा उत्सवाच्या वेळीही कोणताही डोक्यावर व्याप नसल्याचे बोलून दाखविले याबाबत वणीवासीयांना धन्यवाद दिले.

या बैठकीत वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, तहसीलदार शाम धनमणे, प्रभारी मुख्याधिकारी रामगुंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

अवैद्य धंद्यांचा नायनाट हा प्रमुख उद्देश

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ दिलीप भुजबळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वणीतील अधिकाऱ्यांना टोला मारीत म्हटले की, वणी शहरात येणार अधिकारी हा वजनदारच असतो. त्यामुळे साहजिकच वजनदार अधिकारी आल्याने सर्व समस्यांचे निराकरण करण्यास ते समर्थ असतात.

 त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितले की, ते पोलीस अधीक्षक या पदावर रुजू झाल्यापासून अवैध धंद्यांचा नायनाट हा प्रमुख उद्देश राहणार असून याबाबत संबंधित ठाणेदारांना तंबी दिली आहे. आणि शांतता समितीचे सदस्य म्हणून आपणही या कार्यात पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक

करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.