आवाज कमी ठेव DJ, तुला पोलिसांची शपत हाय…
DJ वाजविणा-या गणपती आणि दुर्गोत्सव मंडळावर पोलिसांची करडी नजर
वणी: येत्या महिण्यात होणा-या विविध उत्सवात ध्वनी प्रदूषण करणारे तसेच मिरवणुकीत डीजे वाजविणा-या मंडळावर फोैजदारी कारवाई करण्याची नोटीस पोलीस विभागानं मंडळांना बजावल्या आहेत. परिणामी उत्सवात डीजे वाजविणा-या मंडळावर आता गुन्हे दाखल होणार आहे.
या महिण्यात सण उत्सवाला सुरूवात होणार आहे. पोळा झाला मी गणपती उत्सवाची चाहूल सुरू होते. शहरात विविध गणपती मंडळ, तथा दुर्गाेत्सव मंडळ सार्वजनिक मूर्त्यांची प्रतिष्ठापना करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून गणपती उत्सव, तसेच दुर्गोत्सव मंडळांच्या मिरवणूकीत डीजे वाजवण्याचं फॅड आलं आहे. डीजेचा कानाचा पडदे फाडणारा आवाज त्यामुळे होणारे ध्वणी प्रदूषण यामुळे अनेकांना श्रवणाचे त्रास, मानसिक त्रास असे अनेक आजार झाल्याचे बघायला मिळत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 सह ध्वनी प्रदूषण विनियमन व नियत्रण नियमावली 2000 अन्वये ध्वनीक्षेपक, लाउडस्पिकर, इतर वाद्यांचा वापर नियमबाह्य झाल्यास संबधीत मंडळावर गुन्हे दाखल होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमांचे मंडळाकडून पालन न झाल्यास किंवा ध्वनी प्रदूषण केल्यास मिरवणूकी वापरण्यात येणारे वाद्य साहित्य जप्त करून मंडळावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची सुचना वणीचे ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांनी संबधीत मंडळांना सुचनापत्राद्वारे दिली आहे.
( गावाला पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण )
विर्सजन मिरवणूक ठरलेल्या वेळातच व्हायला हवी, निर्धारित वेळेनंतर मिरवणूक आढळल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास मंडळ सर्वस्वी जबाबदार असणार आहेत. या सुचनांचे पालन न केल्यास तसेच मिरवणूकी डीजे सारखे वाद्य वाजवून ध्वनी प्रदूषण केल्यास गणेश तसेच दुर्गोत्सव मंडळांना कारवाईस सामोरं जावं लागणार आहे. सोबतच ठाणेदारांनी दिलेले सुचनापत्र हाच मंडळाविरूध्द ठोस पुरावा असणार असल्याचे सुध्दा ठाणेदार कुळकर्णी यांनी कळविले आहे.