झरी तालुक्यात ९० टक्के पोलिओ डोस
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात राष्र्टीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत रविवार ११ मार्च रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकास पोलिओचे डोस देण्यात आले. सकाळी ८ ते सायंकाळ ५ वाजेपर्यंत हे डोस देण्यात आले. ५४१८ बालकांपैकी ४८४५ बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले. हे प्रमाण एकूण उद्दीष्टाच्या ९० टक्के इतकं आहे.
झरी तालुक्यातील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रात व एका ग्रामीण रुग्णालयात राष्र्टीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र झरी मधे १८८८ पैकी १७१३ बालकांना (९१ टक्के), प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे ११७२ पैकी ८९७ बालकांना (७६ टक्के), प्राथमिक आरोग्य केंद्र मुकुटबन मध्ये २३५८ पैकी २२३५ बालकांना (९५ टक्के) पल्स पोलिओ लस बालकांना पाजण्यात आली. मुकुटबन येथील बसस्थानकावर सरपंच शंकर लाकडे, प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परीषद सदस्या सौ. संगीता मानकर यांचे हस्ते बालकाना पोलिओ लस पाजण्यात आली.
मोहिमेसाठी तालुक्यात ११७ पोलिओ बूथ, २५३ कर्मचारी, ५ मोबाईल पथक कार्यरत होते. झरी, मुकुटबन, शिबला, पाटण व ईतर ठिकाणी बसस्टँड वर बूथ उभारण्यात आले होते. तसंच प्रत्येक गावात आरोग्य सेविका, अंगनवाडी सेविका, आशा वर्कर यांनी लहान मुलांना पोलीओचा डोस दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी मुकुटबनचे अजय जोगदंड, अभिजीत चारथळ, झरीचे वैद्यकीय अधिकारी अभय विरखडे, शिबल्याचे वैद्यकीय अधिकारी प्रत्तीभा कोवे व माथार्जुन येथील आरोग्य सेविका गोराले यांनी विशेष मोहिम राबवली. अजूनही १० टक्के बालकांचे उद्दिष्टे पूर्ण करायचे आहे तरी प्रत्येक पालकांनी ० ते ५ वयोगटातील आपल्या बालकांना पोलिओची लस पाजून घ्यावी असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी केले आहे.