ब्रेकिंग अपडेट – अखेर वणीच्या निवडणुकीबाबतचा निकाल लागला…

निवडणूक 2 तारखेलाच पण....

बहुगुणी डेस्क, वणी: निवडणुकांच्या प्रचारतोफा अंतिम टप्प्यात आल्या असतानाच अचानक निवडणूक लांबणीवर जाण्याच्या चर्चेने जोर धरला. मात्र आज संध्याकाळी यावरचे सस्पेन्स संपले आहे.  वणीतील निवडणूक ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असून केवळ प्रभाग 14 क या प्रभागाची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे. याबाबत प्रेस रिलिज जाहीर करीत निवडणूक निर्णय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली. 

14 क ची निवडणूक लांबणीवर
प्रभाग क्रमांक 14 (क) चा विषय न्यायलयीन प्रक्रियेत अडकला होता. त्याचा निकाल लागला. मात्र त्या प्रभागातील उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज परत घेण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. त्यामुळे त्यांना पुरेसा व वाजवी अवधी मिळावा यासाठी या प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. अशी माहिती प्रेस रीलिज मधून देण्यात आली आहे. तर या व्यतिरिक्त इतर सर्व निवडणुकीचा कार्यक्रम हा ठरल्या वेळेतच होणार आहे. म्हणजे तर याच प्रभागातील अ व ब या दोन ठिकाणी तसेच इतर तेरा ठिकाणी दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

सदर निर्णयाकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले होते. मात्र आज संध्याकाळी निवडणूक निर्णय़ अधिकारी यांनी याबाबत अधिकृतरित्या माहिती देत संपूर्ण चर्चेला विराम दिला आहे. आज संध्याकाळपासून पुन्हा प्रचाराच्या काहीशा थंडावलेल्या तोफा पुन्हा गरम होणार आहे.

Comments are closed.