रणधुमाळी – तरुणांसाठी अभ्यासिका, घरोघरी दररोज पाणीपुरवठा
सौ. किरण देरकर व शत्रुघ्न मालेकर यांचा प्रभाग 9 मध्ये झंझावात
विवेक तोटेवार, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 अ चे शिवसेना (उबाठा) गटाचे अधिकृत उमेदवार सौ. किरण देरकर आणि प्रभाग 9 ब चे उमेदवार शत्रुघ्न मालेकर यांच्या प्रचार मोहिमेने जोरदार झंझावात निर्माण केला आहे. घरोघरी भेटी, थेट संवाद आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे या दोन्ही उमेदवारांबाबत सकारात्मक वातावरण प्रभागात दिसून येत आहे. दरम्यान त्यांनी मुलबूत सुविधांना प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त करीत प्रभागात अभ्यासिका तयार करण्याचे व पाणी समस्या सोडवण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे शिवसेनेची मशाल या प्रभागात चांगलीच उजळत आहे.
प्रभाग 9 अ आणि 9 ब मध्ये अद्याप काही भागांमध्ये रस्ते, नाल्या, विजेचे खांब आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्धार उमेदवार शत्रुघ्न मालेकर आणि किरण देरकर यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर घेतलेल्या या निर्णयाचे स्थानिक पातळीवर स्वागत होत असून, तरुण व तडफदार नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या या दोन्ही उमेदवारांनी सुविधा-विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
तरुणांसाठी अभ्यासिका, पाण्याची समस्या सोडवणार
शत्रुघ्न मालेकर गेल्या वीस वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्ते असून सामाजिक कामातही अग्रेसर आहेत. निवडून आल्यावर जैन ले-आऊट परिसरात तरुणांसाठी अभ्यासिका तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. परिसरातील तरुणांच्या विकासाला चालना मिळावी, हा त्यांचा उद्देश आहे. तसेच आशियाना हॉलजवळील विवेकानंद शाळा परिसरात अनेक वर्षांपासून घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूपात आहे. हा प्रकार लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याने निवडून आल्यावर त्या परिसरात स्वच्छतेची हमी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दुसरीकडे किरण देरकर यांनी महिलांच्या दैनंदिन समस्येला स्पर्श करत पाणीपुरवठ्याचा मुद्दा मांडला. “सध्या परिसरात पाच दिवसांतून एकदा पाणी येते. निवडून आल्यावर दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. पाणी नसल्यावर काय समस्यांना सामोरे जावे लागते, हे एक स्त्रीच समजू शकते,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.

घरदार संपर्क, पदयात्रा आणि कॉर्नर सभांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. स्थानिक तरुणांसह महिलांचा सहभाग लक्षणीय असून, विकासाच्या आशेने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांना जनता भरभरून पाठिंबा देत आहे.
प्रभाग क्रमांक 9 अ आणि 9 ब मध्ये उमेदवार किरण देरकर व शत्रुघ्न मालेकर यांच्या प्रचार मोहिमेला मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासाची हमी यामुळे या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या दोन्ही उमेदवारांचे बोधचिन्ह मशाल आहे.



Comments are closed.