प्रभाग 9 मध्ये किरण शंकर देरकर व शत्रुघ्न मालेकर यांच्या प्रचाराचा झंझावात

जैन ले आऊट येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात

विवेक तोटेवार, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेना (उबाठा) चे उमेदवार शत्रुघ्न मारोती मालेकर आणि किरण शंकर देरकर यांच्या प्रचाराला वेग आला आहे. संपूर्ण प्रभागात या दोन्ही उमेदवारांचा जोरदार जनसंपर्क सुरू आहे. आज 19 नोव्हेंबर रोजी जैन ले-आऊट येथील हनुमान मंदिरात नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी आमदार संजय देरकर, राजू उंबरकर, किरण संजय देरकर, संजय खाडे, संजय निखाडे, दीपक कोकस यांच्यासह शिवसेना (उबाठा), काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभारंभापासूनच या प्रचारयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रभाग 9 अ मधील अधिकृत उमेदवार सौ. किरण शंकर देरकर या सामाजिक व धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे महिलांपासून युवकांपर्यंत सर्वत्र उत्साही प्रतिसाद मिळत आहे. पती शंकर देरकर यांचे सहकार्य आणि दोघांची सातत्याने सामाजिक सक्रियता यामुळे नागरिकांच्या आग्रहावरूनच त्या नगरसेवकपदासाठी उभ्या राहिल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 9 ब मध्ये शत्रुघ्न मारोती मालेकर हे एक सुपरिचित नाव आहे. उत्तम जनसंपर्क यामुळे ते प्रत्येक घरात पोहोचून मतदारांशी थेट संवाद साधत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजसेवा करणाऱ्या मालेकर यांना युवक वर्गाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या उमेदवारीने प्रचारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

प्रचार शुभारंभावेळी आमदार संजय देरकर यांनी दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते कायम झटत राहणार असा शब्द त्यांनी मतदारांना दिला. जैन ले-आऊट, हनुमान मंदिर परिसर तसेच इतर वॉर्डातील गल्लीबोळांत शत्रुघ्न मालेकर व किरण देरकर यांच्या प्रचारामुळे चैतन्य निर्माण झाले आहे.

 

Comments are closed.