प्रगती नगर दरोडा प्रकरणातील 2 आरोपी अद्यापही फरार

गोकुळनगर येथील रहिवासी असलेल्या बहिण भावांनी असा तयार केला प्लान...

विवेक तोटेवार, वणी: प्रगतीनगर दरोडा प्रकरणात अद्यापही 2 जण फरार आहेत. वणी पोलीस त्यांचा शोध युद्धपातळीवर घेत आहेत. याआधीच पोलिसांनी एक महिलेसह 5 जणांना जालना, वसमत व वणी येथून अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यातील 4 जणांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली तर आरोपी महिलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

दिनांक 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री प्रगतीनगर येथील रहिवासी असलेल्या सुभाष डोर्लीकर यांच्या घरी 6 दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न फसला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या 2 दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. मुकिंदसिंग टाक, सावनसिंग टाक यांना जालना येथून अटक केली. पोलिसांना घटनेत वापरलेली कार देखील मिळाली. तर सतनामसिंग चव्हाण याला वसमत येथून अटक केली. यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे तार वणीशी जुळलेले असल्याचे समोर आले. पोलिसांनी या घटनेची मास्टरमाइंट असलेले भाऊ बहिण राणी ब्राह्मणे व तिचा भाऊ समिंदरसिंग टाक दोघेही रा. गोकुळनगर वणी यांना अटक केली.

असा तयार झाला प्लान
मुख्य सूत्रधार राणी विनोद ब्राह्मणे हिने तिचा भाऊ समिंदरसिंग टाक हे गोकुळनगर येथील रहिवासी आहे. समिंदरसिंग हा काही वर्षांपूर्वी डोर्लीकर यांच्याकडे कामाला होता. त्यामुळे समिंदरसिंगला डोर्लीकर यांच्याबाबत संपूर्ण माहिती होती. त्याने याबाबत तिच्या बहिणीला सांगितले. तसेच डोर्लीकर यांचा मुलगा व मुलगी हे बाहेरगावी शिकत असतात. घऱी केवळ डोर्लीकर दाम्पत्यच घरी असते याची देखील माहिती काढली. त्यानंतर दोघा बहिण भावांनी दरोड्याचा प्लान केला. दरोड्यासाठी मदत म्हणून त्यांनी त्यांच्या हिंगोली जिल्ह्यातील नातेवाईकांना संपर्क साधला. या नातेवाईकांनी कारची अरेंजमेंट केली. दरोडा टाकण्याची तारीख ठरली. तसेच दरोड्यात कुणाचा किती शेअर असेल हे ठरले. त्यानंतर 6 जणांनी 4 सप्टेंबरच्या मध्यरात्री डोर्लीकर यांच्या घरी दरोडा टाकला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दरोडा घडताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सीसीटीव्ही फूटेज चेक व लोकेशन चेक करून पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी जालना येथून दोघांना, एकाला वसमत येथून अटक केली. त्यांच्या चौकशीतून वणी येथील आरोपींची नावे समोर आलीत. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वाढवण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.