प्रक्षेत्र निवडणूक: परिवर्तनने केले त्यांच्याच पॅनलच्या उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप !

परिवर्तनच्या अजब दाव्यांची मतदारांमध्ये उलवली जातेय खिल्ली

बहुगुणी डेस्क, वणी: सध्या प्रक्षेत्र खासगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीच्या आक्रमक प्रचाराने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधले आहे. जय विकास व परिवर्तन असे दोन पॅनल या निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. परिवर्तन पॅनलने जय विकास पॅनलवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र आम्ही सत्तेतच नाही, उलट त्यांच्याच पॅनलमधले उमेदवार सत्तेत होते. त्यामुळे परिवर्तन पॅनल त्यांच्याच उमेदवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. परिवर्तनच्या अजब दाव्यामुळे मतदारांमध्ये सध्या खिल्ली उडवली जात आहे, असा आरोप जय विकास पॅनलद्वारा करण्यात आला आहे.

काय आहे जय विकास पॅनलचा दावा?
संस्थेच्या वार्षिक सभेत निवडणूक अविरोध करण्यास मतदारांचे बहुमत होते. मात्र मतदारांच्या मताचा अनादर करून स्वत:चे पॅनल उभे करून निवडणूक लावली. यामुळे सर्वसामान्य मतदारांचा लाभांश कमी झाला आहे. परिवर्तन पॅनल सध्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करीत आहे. मात्र गेल्या वेळी हेच पॅनल सत्तेत होते. मात्र त्यांनी कधी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला नाही. उलट जय विकास पॅनलचे उमेदवार हे विरोधक होते. सत्तेत नसलेल्या लोकांवरच परिवर्तन पॅनल भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहे. हा दावा निरर्थक व हास्यास्पद आहे.

मतदारांना मिसगाईड करण्याचा प्रकार
गेल्या वेळी सत्तेत असलेले लोकच यावेळी विरोधकांचे असलेले परिवर्तन पॅनल हे नाव घेऊन निवडणूक लढत आहे. हा मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रकार आहे. तसेच जय विकास पॅनलचे उमेदवार सत्तेत नव्हते. त्यांचा जुन्या सत्ताधारी पॅनलशी कोणताही संबंध नाही. मात्र तरी देखील जय विकास पॅनल भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप परिवर्तन करीत आहे. हा मतदारांना मिसगाईड करण्याचा प्रकार आहे, असा आरोप देखील जय विकास पॅनलकडून करण्यात येत आहे.

जय विकास पॅनलचे बोध चिन्ह छत्री असून या पॅनलतर्फे सर्वसाधारण प्रवर्गातून जय विकास पॅनलतर्फे संतोष वसंतराव चिल्कावार, नत्थू मारोती जेऊरकर, आत्माराम नारायण ताजणे, राजेंद्र नथ्थूजी देवतळे, प्रकाश देवराव देवाळकर, अरुण नारायणराव पहुरकर तर ओबीसी प्रवर्गातून भुपेंद्र पांडुरंग देरकर, अनु जाती जमाती प्रवर्गातून अरविंद उद्धवराव तिरणकर, विजा प्रवर्गातून विनोद पुंडलिक बुच्चे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून अश्विनी तानाजी टेकाम व गाथा विजयराव पिपराडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सत्य परिस्थिती मतदारांना चांगलीच माहिती आहे. परिवर्तन पॅनलने कितीही खोटा प्रचार केला तरी मतदार यावेळी त्याला बळी पडणार नाही. तसेच सत्तेवर आल्यावर भ्रष्टाचार कोण करतो याची मतदारांना चांगलीच जाण आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन पॅनलने मतदारांमध्ये कितीही गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी मतदार त्यांना जागा दाखवून देणार, अशी आशा जय विकास पॅनलने व्यक्त केली आहे. 

Comments are closed.