पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाविकास आघाडीच्या चंद्रपूर-आर्णी लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात मुकूटबन येथील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) गटात शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश झाला. मुकुटबन येथील युवा नेतृत्व संदीप विंचू माजी उपसभापती कृ. ऊ. बा. समिती झरी व अशोक कल्लूरवार ग्रा. पं.सदस्य मुकूटबन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश ताडूरवार, माजी ग्रा.पं सदस्य, विकास बट्टावार माजी ग्रा. पं.सद्स्य, मधुकर पारशिवें माजी ग्रा. पं. सद्स्य, अनिल धरणीवार, राम मन्दूलवार, प्रदीप पुंगुरवार सोसायटी संचालक, डॉ. नेताजी पारशिवे, महेश आसुटकर, राकेश मुद्दमवार, अर्जुन इंगोले, संजय आसुटकर, हनुमान कल्लूरवार, संतोष चेटपेल्लीवार इत्यादींनी पक्षश्रेष्टिंवर विश्वास ठेवत प्रवेश घेतला.
याप्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, विजय पानघंटीवार संचालक खरेदी विक्री झरी, अशोक बरपटवार विभाग प्रमुख, भगवान मोहिते, प्रवीण चिटलावार शाखा प्रमुख मुकुटबन आणि गावकऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रम झाला,
युवा पिढी हाच नव्या युगाचा आधार – संजय देरकर
शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढणारी संघटना आहे. शिवसेना केवळ राजकीय पक्षच नाही तर अन्याय अत्याचाराविरुद्ध उठणारा बुलंद आवाज आहे. युवा पिढी हाच नव्या युगाचा आधार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी युवकांना पक्षाशी जोडून उद्धव साहेबांचे हात मजबूत करावे.
– संजय देरकर, विधानसभा प्रमुख
Comments are closed.