प्रतिभा धानोरकरांच्या उमेदवारीने काँग्रेसमध्ये उत्साह

काँग्रेसने मजबूत उमेदवार उतरवल्याने लढत रंगतदार

विवेक तोटेवार, वणी: अनेक दिवसांच्या वाटाघाटीनंतर अखेर प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली. या 10 ते 15 दिवसात अनेक घडामोडी घडल्या. सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात एक मजबूत उमेदवार उमेदवार मिळाल्याने वणी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. चंद्रपूर येथे 27 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी हा उत्साह दिसून आला. यावेळी झालेल्या शक्तीप्रदर्शनात वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती लावली.
महाविकास आघाडीची वज्रमुठ
प्रतिभा धानोरकर यांना समर्थन देण्यासाठी वणीतून काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाचे नेते चंद्रपूर येथे गेले होते. या शक्ती प्रदर्शनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय देरकर, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याने यावेळी महाविकास आघाडीची वज्रमुठ दिसून आली.

महाविकास आघाडी फार्मात – संजय खाडे
काँग्रेस पक्षाने एक सक्षम उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गावखेड्यातील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी ठिकठिकाणी गृहभेट, बैठकीचे सत्र सुरु केले आहे. प्रतिभाताईंना यावेळी शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार), संभाजी ब्रिगेड, माकप इ. पक्षाचे समर्थन असल्याने हे सर्व पक्षीय कार्यकर्ते प्रचाराच्या कामाला लागले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सध्या फार्मात आहे.
– संजय खाडे, काँग्रेस

प्रचाराच्या नियोजनासाठी वामनराव कासावार यांच्या घरी पदाधिका-यांची बैठक

लढत होणार चुरशीची
सुधीर मुनगंटीवार यांची धडाडीचे नेते म्हणून ओळख आहे. मंत्री झाल्यानंतर त्यांनी विविध विकासकामे आपल्या मतदारसंघात केली. त्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे. सुधीर मुनगंटीवार हे निवडून आल्यास परिसराचा विकास होईल, अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांच्या पाठिशी सहानुभूतीची लाट आहे. गेल्या काही काळांपासून प्रतिभा यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. दांडगा जनसंपर्क, मनमिळावून स्वभाव, तळागाळातील लोकांशी थेट मिसळणे इत्यादी कारणांसाठी प्रतिभा या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.